
छत्रपती संभाजीनगर / वाळूज : वाळूज महानगरातील बजाज नगर परिसरातील नानी पार्कच्या मागील श्री गणेशाय नमः हाउसिंग सोसायटी, प्लॉट क्र. आरएच-16, घर क्र. 2 येथे राहणाऱ्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवार, ३ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, करण राधेश्याम गायकवाड (वय अंदाजे २५ वर्षे) हा मूळचा परळी, जि. बीड येथील रहिवासी होता. तो सध्या आपल्या आई-वडील, भाऊ आणि पत्नीसह वाळूज येथे भाड्याच्या दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होता. तो वाळूज एमआयडीसी परिसरात ठेकेदारामार्फत काम करत होता.
शुक्रवारी दुपारी त्याचे वडील व पत्नी घरात असताना करणने आपल्या खोलीतील छताच्या लोखंडी हुकला साडी बांधून गळफास घेतला. काही वेळाने तो फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात अॅम्ब्युलन्सद्वारे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच डायल 112 वरील पोलिस कर्मचारी सचिन ठोकळ व ज्ञानेश्वर ठाकूर घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. ही घटना एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

