शेतकऱ्यांचा प्रशासनाला गंभीर सवाल

न्युज मराठवाडा वृत्तसेवा : गोकुळ लांडे
गंगापूर : गंगापूर तालुक्यात सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा कोसळलेल्या या अवकाळी पावसामुळे बळीराजा पूर्णतः जेरीस आला असून “अस्मानी संकट पाचवीला पुजले आहे का?” असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
कापणीस आलेला गहू तसेच काढून तसेच काढणीस तयार असलेला कांदा पिक शेतातून घरापर्यंत पोहोचण्याआधीच पावसाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तब्बल तीन तासापेक्षा अधिक सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याचे चित्र आहे.अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असून डोळ्यांसमोर उभी पिके मातीमोल होत असल्याची हळहळ शेतकरी व्यक्त करत आहे.
पहिल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे नाही: तालुक्यातील भेंडाळा मंडळातील लखमापूर,अमळनेर,कायगाव, त्याचबरोबर पखोरा,भेंडाळा,गळनिंब, भिव धानोरा परिसरात मागील तसेच सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने उभ्या शेतमालांचे मोठे नुकसान झाले आहे.पहिल्या अवकाळी पावसाने नुकसान झाले असताना देखील तलाठी तसेच कुठल्याच शासकीय कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कुठलेही पंचनामे केले नसून शेतकऱ्यांमध्ये याचा मोठा संताप तयार होत आहे.
रामेश्वर मिसाळ(शेतकरी अमळनेर)
आ. प्रशांत बंब यांनी तहसीलदारांना पंचनामे करण्याचे सांगितले होते
आ. प्रशांत बंब साहेब यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी संदर्भात मा.तहसीलदार गंगापूर व संबंधित यंत्रणेला त्वरित पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याचे सांगितले होते त्याप्रमाणे, संबंधित यंत्रणेकडून पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळण्याकरिता आ.प्रशांत बंब साहेब यांच्या हे पाठपुरावाही करत आहेत,
सुरेश शिंदे दहेगावकर(भाजपा तालुकाध्यक्ष गंगापूर)
आमदारांच्या त्या पत्राचे काय झाले..?
गंगापूर तालुक्यातील भेंडाळा मंडळामध्ये 18 मार्च च्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाण नुकसान झाले आहे. यामध्ये कायगाव लखमापूर गणेशवाडी अमळनेर गळनिंब आदी गावांच्या शिवारामध्ये गहू तसेच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असताना देखील तहसील विभागाकडून कुठलाही पंचनामा झाला नाही. अशातच गंगापूर तालुक्याचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांनी तहसील प्रशासनाला दिलेल्या त्या पत्राचे काय झाले असा सवाल संतप्त शेतकरी उपस्थित करत आहे.
-
आषाढी एकादशीनिमित्त वाळूज-पंढरपूर परिसरात वाहतुकीचे विशेष नियोजन

Share Total Views: 570 २५ जुलैपर्यंत अनेक मार्गांवर निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
-
भरधाव कारची उभी कंटेनरला धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Share Total Views: 370 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरातील
-
राष्ट्रीय पॅरा तायक्वान्दोत रुद्र पांडेची कांस्यपदकावर मोहोर

Share Total Views: 853 पॅरा पुमसे प्रकारात महाराष्ट्रातून पदक जिंकणारा एकमेव खेळाडू न्यूज मराठवाडा वृत्तसेवा:
