२५ जुलैपर्यंत अनेक मार्गांवर निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर
आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाळूज परिसरातील पंढरपूर येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांसह सुमारे १५० ते २०० दिंड्या दाखल होणार असल्याने छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन लागू केले आहे. २४ जुलै रोजी रात्री ८ वाजल्यापासून २५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे नियोजन लागू राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यात्रेनिमित्त राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तात्पुरती दुकाने उभारली जातात. तसेच भाविक, पायी दिंड्या आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्याने अपघात टाळणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ए.एस. क्लब चौक ते कामगार चौक तसेच ओअॅसिस चौक ते एफडीसी (आंबेडकर) कॉर्नर हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. इसारवाडी फाटा ते कामगार चौक तसेच नगरनाका ते ए.एस. क्लब चौक या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
जालना, बीड, धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, अहिल्यानगर तसेच एमआयडीसी वाळूज परिसरातून येणाऱ्या हलक्या व जड वाहनांसाठी महानुभव आश्रम चौक, कांचनवाडी, चित्तेगाव, बिडकीन, इसारवाडी फाटा, साजापूर फाटा, एनआरबी चौक, एफडीसी कॉर्नर, वाल्मी नाका आणि राष्ट्रीय महामार्ग NH-752A या मार्गांवरून पर्यायी वाहतूक वळविण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या सर्व बसेस आणि खासगी ट्रॅव्हल्सनाही पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थितीनुसार वाहतुकीत आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार बंदोबस्त प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच प्रवासापूर्वी पर्यायी मार्गांची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी केले आहे.
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”

Share Total Views: 23 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!

Share Total Views: 383 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!

Share Total Views: 23 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
