
न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसी वाळूज परिसरात महिला औद्योगिक कामगारांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून 66 ग्रॅम वजनाचे सुमारे 8 लाख 74 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी फिरोज लखन अजिन शेख (वय 32, रा. नेवासा फाटा, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भा. न्याय संहिता 2023 च्या कलम 316(2) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने MIDC वाळूज परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी महिला कामगारांना लक्ष्य करत मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना केल्या होत्या. 20 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी आणि 10 मार्च 2026 रोजी घडलेल्या तीन घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास करण्यात आले होते.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून 4.98 लाख, 1.59 लाख आणि 2.17 लाख रुपये किमतीचे असे एकूण 8.74 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अळुकर व सहायक पोलीस आयुक्त डॉ. भाग्यश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या नेतृत्वात पार पडली.
या अटकेमुळे परिसरातील मंगळसूत्र चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
