
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर
छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरातील साजापूर येथील शांताई पेट्रोल पंपासमोर मंगळवारी (रात्री) सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी कार महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग कंटेनरमध्ये घुसून पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा गणेश दहीवाल (वय २०, रा. बजाजनगर, मूळ गाव- गुरु पिंपरी, ता. घनसावंगी, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.
कृष्णा हा एमएच-०२-एक्यू-१३०७ क्रमांकाच्या कारमधून करोडी टोलनाक्याच्या दिशेने एकटाच जात होता. शांताई पेट्रोल पंपासमोर महामार्गाच्या कडेला अधिकृत पार्किंग नसताना उभ्या असलेल्या एनएल-०१-क्यू-८४३७ क्रमांकाच्या कंटेनरला त्याच्या कारची मागून जोरदार धडक बसली. धडकेनंतर कारचा पुढील भाग कंटेनरमध्ये घुसल्याने कृष्णा कारमध्ये अडकून गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पीएसआय विनोद आबुज व सहकारी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कृष्णाला कारमधून बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून रात्री सुमारे २.३० वाजता त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी मृताच्या काका कालिदास ज्ञानेश्वर दहीवाल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अधिकृत पार्किंग नसताना तसेच आवश्यक इशारा (इंडिकेटर) न देता कंटेनर उभा केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय संदीप घुसिंगे करीत आहेत.
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”

Share Total Views: 24 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!

Share Total Views: 398 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!

Share Total Views: 24 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
