Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा: वाळूज महानगर
सायबर गुन्हेगारी टोळीला आर्थिक व्यवहारासाठी स्वतःचे बँक खाते वापरू दिल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात एका फोटो स्टुडिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने कमिशनच्या मोबदल्यात गुन्ह्यातून प्राप्त झालेली रक्कम विविध बँक खात्यांमध्ये RTGS व NEFT द्वारे वर्ग करण्यासाठी सक्रिय मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप सिताराम राजपूत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
आरोपी हा गणेश मल्टी सर्विसेस अँड फोटो सर्विसेसचा चालक-मालक असून तो रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर 2025 ते 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीत बजाजनगर येथील बँक ऑफ बडोदा शाखेतील खात्याचा वापर करून गुन्ह्यातून प्राप्त झालेली रक्कम RTGS व NEFT द्वारे इतर बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली. या व्यवहारांसाठी आरोपीने कमिशन स्वीकारून आपले बँक खाते उपलब्ध करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
प्राथमिक तपासात आरोपी हा सायबर गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सदस्य म्हणून काम करत असल्याचे समोर आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते करीत आहेत.
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”

Share Total Views: 24 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!

Share Total Views: 398 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!

Share Total Views: 24 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
