
न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवासाठी जन्मोत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दिनांक 29 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
यंदा महात्मा फुले जयंती महोत्सवाचे नववे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्याचे ठरविण्यात आले. जयंतीनिमित्त संत सावतामाळी मंदिर, चिंचबन कॉलनी ते महात्मा ज्योतिराव फुले स्मारक, बजाजनगर या मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत लेझीम पथक व झांज पथक सहभागी होणार आहेत.
तसेच, 10 एप्रिल रोजी महात्मा फुले स्मारक, बजाजनगर येथे विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
बैठकीत जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी किसन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून मारुती शिंदे, मनोज बोरसे, चंद्रकांत माळी व वैशाली अवघडे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी प्रीती देवकर, सहसचिवपदी सुनंदा कुदळे, ताराताई शिंदे व पंढरीनाथ पवार, कोषाध्यक्षपदी ज्ञानेश्वर डाके, तर सहकोषाध्यक्षपदी गणपत जिते व विठ्ठल शहाणे यांची निवड झाली आहे.
कार्याध्यक्षपदी गोरख पवार, कृष्णा पवार व गणेश पवार, सहकार्य अध्यक्षपदी अक्षय गोरे, संघटकपदी जयप्रकाश सारंग, प्रदीप माळी व लताताई माळी, तर प्रसिद्धीप्रमुखपदी रुपेश कुदळे, बालू जेजुरकर, ज्ञानेश्वर खोबरे व विशाल लगड यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सल्लागार मंडळात समावेश करण्यात आला असून, संस्थापक अध्यक्ष चक्रधर डाके व संस्थापक सचिव संतोष उगले यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार व समाजप्रबोधन हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असून, यंदाचा उत्सव अधिक भव्य करण्यासाठी समिती सज्ज झाली आहे.
-
आषाढी एकादशीनिमित्त वाळूज-पंढरपूर परिसरात वाहतुकीचे विशेष नियोजन

Share Total Views: 570 २५ जुलैपर्यंत अनेक मार्गांवर निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
-
भरधाव कारची उभी कंटेनरला धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Share Total Views: 370 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरातील
-
राष्ट्रीय पॅरा तायक्वान्दोत रुद्र पांडेची कांस्यपदकावर मोहोर

Share Total Views: 853 पॅरा पुमसे प्रकारात महाराष्ट्रातून पदक जिंकणारा एकमेव खेळाडू न्यूज मराठवाडा वृत्तसेवा:
