Screenshot
पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या मैदानात चोरट्याचा धाडसी प्रकार; एमआयडीसी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल

न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज महानगर| प्रतिनिधी
सिडको महानगर परिसरात भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी घडली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला गजानन सपकाळ (वय 61, रा. पाण्याच्या टाकीजवळ, सिडको महानगर-1, छत्रपती संभाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दि. 14 जुलै रोजी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या मैदान परिसरात त्या असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण लबाडीच्या उद्देशाने हिसकावून नेले.
या घटनेनंतर महिलेने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून नागरिकांनी संशयास्पद व्यक्तींबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”

Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!

Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!

Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
