
छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगरात घरघुती गॅस सिलेंडरच्या टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, काही व्यावसायिकांकडून त्याच घरगुती सिलेंडरचा सर्रास व्यवसायासाठी वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांना घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. अनेकांना बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेले कमर्शियल सिलेंडर उपलब्ध नसल्याने काही व्यावसायिकांनी घरगुती सिलेंडरचा वापर सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.
कोलगेट चौकाजवळील बीएसएनएल कार्यालयासमोर एका रिक्षामध्ये सुरू असलेल्या पंचर दुकानात घरगुती सिलेंडरचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय भर रस्त्यात सुरू असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसी परिसरात एका बंद कंपनीत शेकडो सिलेंडरचा साठा आढळून आला होता. पुरवठा विभागाने छापा टाकून कारवाईही केली होती. तरीदेखील अशा प्रकारांना आळा बसत नसल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
घरगुती वापरासाठी असलेले सिलेंडर व्यवसायासाठी वापरणे हे नियमबाह्य असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई होणार का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


