
बजाजनगर / बातमीदार :
वाळूज एमआयडीसी परिसरातील वैष्णो देवी मंदिराजवळील प्लॉट क्रमांक सी-८७ येथील एका बंद कंपनीत तब्बल ४०३ घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर सापडल्याने खळबळ उडाली. ही कारवाई मंगळवार (१७ मार्च) रोजी करण्यात आली असून सर्व सिलिंडर रिकामे (एमटी) असल्याची प्राथमिक माहिती आहे.

एमआयडीसी प्रशासनाकडून बंद कंपन्यांची तपासणी सुरू असताना अधिकाऱ्यांच्या पथकाला हे सिलिंडर आढळले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले असून पुरवठा विभागालाही माहिती देण्यात आली आहे. आज (१८ मार्च) अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.या घटनेमुळे इतर काही कंपन्यांचीही पाहणी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. यात इतर कंपन्यांचे काही कनेक्शन आहे का हेही उघड होण्याची शक्यता आहे.

अवैध साठवणुकीचा संशय
इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर सापडल्यामुळे येथे अवैधरित्या गॅस रिफिलिंग करून औद्योगिक कंपन्या व हॉटेल व्यवसायांना विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तपास सुरू
पोलिस व डीसीपी पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, पुढील चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
॰॰॰॰
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



