
वाळूज महानगर : परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मंगळवारी (दि. १७) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर शतपावली करत असलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली.
सुमन बंडू राठोड (रा. सारा वृंदावन, वाळूज महानगर १) असे पीडित महिलेचे नाव असून, त्या त्यांच्या पुतणी शीतल सुभाष राठोड यांच्यासोबत शतपावली करत होत्या. या दोघी शिवाजी महाराज चौकाकडून आर्किड शाळेकडे जात असताना वळण घेऊन पुन्हा चौकात येत असताना, विरुद्ध दिशेने दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले.
यावेळी झालेल्या झटापटीत सुमन राठोड यांनी प्रसंगावधान राखत मंगळसूत्राचा काही भाग वाचवला. मात्र सुमारे २.५ ग्रॅम सोन्याचा भाग चोरट्यांनी लंपास केला. घटनेनंतर त्यांनी तत्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधत वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.
या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


