
वाळूज महानगर : पुढे पोलीस आहे व चेकिंग सुरू आहे अशी बतावणी करून एका ६३ वर्षीय व्यापाऱ्याच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन लुबाडल्याची घटना वाळूज महानगर परिसरात घडली. ही घटना दि. १३ मार्च रोजी दुपारी सुमारे १ वाजेच्या दरम्यान घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बन्सीलाल संपतलाल भन्साळी (वय ६३, रा. ए. एस. क्लब जवळ, सिडको वाळूज महानगर-१) हे व्यापारी असून ते आपल्या घरून दुचाकीने औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत कामानिमित्त निघाले होते. संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गावरील सिडको वाळूज महानगर-१ प्रवेशद्वाराजवळ आले असता दोन अज्ञात इसम त्यांच्या मागून आले आणि त्यांनी भन्साळी यांना थांबवले.
दरम्यान, या भामट्यांनी पुढे पोलीस आहेत व चेकिंग सुरू असल्याचे सांगत भन्साळी यांच्या समोरच मुद्दाम एकमेकांपैकी एकाला दम देत मारहाण केल्याचा आव आणला. हा प्रकार पाहून भन्साळी घाबरले. त्यानंतर आरोपींनी गळ्यातील सोन्याची चेन काढून ठेवण्यास सांगितले.
भन्साळी यांनी चेन काढल्यानंतर ती खिशात न ठेवता दुचाकीच्या डिक्कीत ठेवण्यास सांगितले. मात्र “मी ठेवतो” असे सांगत आरोपींनी हातचलाखी करून चेन असलेली पुडी बदलली आणि त्यांच्या हातात दगड बांधलेली पुडी देऊन तेथून पोबारा केला.
काही वेळाने पुडी उघडल्यावर त्यामध्ये दगड असल्याचे लक्षात येताच भन्साळी यांनी तातडीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकारामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये तसेच अशा संशयास्पद प्रकारांची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


