
वाळूज महानगर : पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीनंतर वाळूज महानगरातील राजकारण चांगलेच तापले असून उबाठा गटातील तीन सदस्यांच्या गैरहजेरीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. उबाठा गटाचे निवडून आलेले सदस्य दत्तात्रय वर्पे, सतीश हिवाळे आणि लताबाई कानडे हे तिघेही निवडीच्या दिवशी अचानक गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
निवडीच्या दिवशीच तिन्ही सदस्य अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या गैरहजेरीमागे नेमके कारण काय, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज महानगरातील पालकमंत्री प्रमुख असलेल्या एका दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला सभापतीपदी निवडून देण्यासाठी उबाठा गटातील काही नेत्यांकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. संबंधित उमेदवार व त्यांच्या पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान उबाठा गटाच्या विरोधात प्रचार केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अशा पक्षाच्या उमेदवाराला सभापतीपदी पाठिंबा देणे म्हणजे स्वाभिमानाशी तडजोड ठरेल, अशी भूमिका या तिन्ही सदस्यांनी घेतल्याची चर्चा आहे. याच कारणामुळे त्यांनी निवड प्रक्रियेत सहभागी न होता जाणीवपूर्वक गैरहजर राहण्याचा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, या गैरहजेरीनंतर उबाठा गटातील काही कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही कार्यकर्त्यांनी संबंधित सदस्यांच्या घरासमोर जाऊन घोषणाबाजी करत निदर्शने केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हे तिघे गैरहजर राहिल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे.
याशिवाय, काही नेत्यांनी या तिघांवर पैसे घेऊन जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याचा आरोपही केला असून त्यांच्या कोणत्याही स्पष्टीकरणावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे वाळूज महानगरातील राजकारण ढवळून निघाले असून पुढील काही दिवसांत या प्रकरणाला आणखी राजकीय वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेत्यांची इच्छा की कार्यकर्त्यांचा रोष?
उबाठा गटाचे तीन पंचायत समिती सदस्य सभापती व उपसभापती निवडणुकीत गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारला जात आहे. मात्र हा शिक्का नेमका वरिष्ठ नेत्यांकडून मारला जात आहे की स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून, याबाबत स्पष्टता नाही.
सभापती व उपसभापती निवडणुकीसंदर्भात अनेकदा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतले जातात. चर्चेनुसार, सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान ज्या गटाने उबाठा गटाच्या विरोधात काम केले, त्याच पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांना सभापती व उपसभापती करण्याचा दबाव काही वरिष्ठ स्तरावरून असल्याचे बोलले जात आहे.
मात्र निवडून आलेल्या या तिन्ही पंचायत समिती सदस्यांनी अशी भूमिका घेतली की, ज्यांनी निवडणुकीत आपल्याविरोधात काम केले त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला सभापतीपदी पाठिंबा देणे म्हणजे स्वाभिमानाशी तडजोड ठरेल. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी तटस्थ भूमिका घेत निवडणूक प्रक्रियेत गैरहजेरी दाखवली, अशीही चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये सुरू आहे.
यामुळे हे तिघे सदस्य गद्दार आहेत की स्वाभिमानी, याचा अंतिम निर्णय मतदार आणि जनता ठरवतील. वरिष्ठ नेते किंवा स्थानिक नेतृत्वाला कोणालाही थेट गद्दार ठरवण्याचा अधिकार नाही, असेही मत काही मतदारांकडून व्यक्त केले जात आहे.
पक्षांतर्गत वादामुळे होतोय निषेध
स्थानिक व लोकनियुक्त सदस्य यांच्यातील पाक्षिक वाद
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बजाज नगरात दोन गट आहे हे सर्वांना माहिती आहे त्यात जुन्या कार्यकर्त्याला ड डावलून शहर प्रमुख पद युवा सेनेच्या कार्यकर्त्याला दिल्यामुळे मूळ शिवसेनेचे पदाधिकारी दुखावले गेले होते तसेच सिडकोतील राजकारणामुळे विद्यमान तालुकाप्रमुख व इतर सदस्यांमध्ये वाद आहे हा वाद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार नसल्यामुळे नाईलाज असतो मिटला होता मात्र मनोमिलन होऊ शकले नव्हते गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनात शिवसेनेकडून आंदोलन नसल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला होता तर निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांनी मतदारांच्या भावना लक्षात घेऊन निवडणूक होताच पाण्यासाठी आंदोलन छेडले होते या आंदोलनात आमचे फोटो नाही असे म्हणून वरिष्ठ पक्ष पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती त्यामुळे वाद आणखीन विकोपाला केला होता त्यातच या गैरहजेरीमुळे त्यांना आई ते कोलीत मिळाले होते म्हणून या गैरहजर सदस्यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्याचा हीच वेळ आहे समजून निषेध केला गेला अशी चर्चा आहे
॰॰॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


