
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( अशोक अधाने ) –
छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिरात प्रशासनाने थेट नागरिकांच्या तक्रारी ऐकून अनेक प्रलंबित कामांचा जागीच निपटारा केला.
वेरुळ येथील श्री संत जनार्दन स्वामी संस्कार भवन येथे झालेल्या या शिबिराला सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड होते, तर पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे आणि योगिता बर्डे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी खुलताबादचे तहसीलदार संतोष गुट्टे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत नागरिकांना मार्गदर्शन केले.
शिबिरात प्रामुख्याने ७/१२ उताऱ्यांचे वितरण व दुरुस्ती, संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज स्वीकारणे, अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्कासंदर्भात मार्गदर्शन तसेच गाव दप्तर अद्ययावत करण्याची कामे करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले फेरफार आणि कागदपत्रांतील त्रुटी यावेळी जागीच दुरुस्त करण्यात आल्या.
यावेळी पानद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यता, घरकुल लाभार्थ्यांना पट्टेवाटप तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध दाखल्यांचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत महसूल विभागाचे आभार मानले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले.
॰॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


