Screenshot

छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील पाणी प्रश्नावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या घडाफोड आंदोलनानंतर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात २१ जणांसह इतर ८० ते १०० आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी केशवराव फलके (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मार्च रोजी सकाळी सुमारे ११.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान सोलापूर–धुळे महामार्ग परिसरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाणी प्रश्नावर आंदोलन करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र आंदोलनकर्त्यांनी परवानगी नसतानाही आंदोलन करत काही ठिकाणी घडे फोडून निषेध व्यक्त केला.

दरम्यान वडगाव गट नंबर परिसरात आंदोलनकर्त्यांनी घडाफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांनी जि.प. सदस्या ललिता सुरेश सोनवणे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय वर्पे, सुरेश साहेबराव सोनवणे यांच्यासह काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अनेक आंदोलनकर्ते पोलिस ठाण्यात एकत्र जमून निषेध नोंदवत असल्याने काही काळ पोलिसांची धावपळ उडाली.

या प्रकरणी ललिता सोनवणे, दत्तात्रेय वर्पे, सुरेश साहेबराव सोनवणे, संजय वाडेकर, लक्ष्मण सांगळे, दत्तू लघाणे, सुरेश बाबुलाल सोनवणे, अनिता डहारिया, संतोष रामदास चंदन, भगवान गायकवाड, विजय सुधाकर वाडेकर, भाग्यश्री संतोष जाधव, प्रदीप वैजनाथ काटकर, नरसिंग ढगे, विष्णू सोनटक्के, प्रमोद पडूळ, विष्णू आसाराम गायकवाड, सारिका केशव कदम, संगीता विलास काकडे, मनोज सोनवणे, लक्ष्मण बहीर यांच्यासह इतर ८० ते १०० आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बीएनएस कलम २२१, १२५, २२६(२), २२३, १८९(२), १८९(३), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत.
॰॰॰॰
-
ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे MHT-CET परीक्षेत घवघवीत यश
Share Total Views: 3 वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) बजाजनगर,
-
ESIC रुग्णाकडून अवैध पैसे उकळल्याचा आरोप; हॉस्पिटलने आरोप फेटाळले…
Share Total Views: 23 छत्रपती संभाजीनगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) वाळूज
-
रूम भाड्याच्या वादातून तरुणाची आत्महत्या; रूम मालकासह तिघांविरोधात गुन्हा
Share Total Views: 83 वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) वाळूज



