
छत्रपती संभाजीनगर/नाशिक :
मेस फी थकबाकीच्या कारणावरून १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच विद्यार्थ्याच्या वडिलांना अकॅडमी संचालकांकडून जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात एट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील रिक्षाचालकाचा मुलगा हा गरुडझेप करिअर अकॅडमी येथे निवासी शिक्षण घेत असून सध्या १२ वी सायन्समध्ये शिक्षण घेत आहे. बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था शरणापुर येथे करण्यात आली होती, तर परीक्षा केंद्र फुलंब्री येथे होते.
तक्रारीनुसार, फेब्रुवारी महिन्याची मेस फी बाकी असल्याने २३ फेब्रुवारी रोजी संबंधित विद्यार्थ्याला सकाळी नाश्ता देण्यास अडविण्यात आले. दुपारच्या जेवणावेळी फी संदर्भात विचारणा करून सही घेतल्यानंतरच जेवण देण्यात आले. सायंकाळी पुन्हा जेवणासाठी अडविल्याने विद्यार्थ्याने मित्रांसह बाहेरून अन्न मागवले. त्यानंतर काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कार्यालयात नेऊन हाताने मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या मारहाणीमध्ये विद्यार्थ्याच्या नाकातून रक्त आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालक अकॅडमीत गेले असता संचालक निलेश सोनवणे यांच्यासोबत शाब्दिक वाद झाला. यावेळी जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित शिक्षक व अकॅडमी संचालकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अकॅडमीचे संचालक निलेश सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे.
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 5 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
- (no title)Share Total Views: 5 बजाजनगरातील जिवघेणा हल्यातील तीन आरोपी पोलसांकडून अटक; फायरिंगचाही झाला होता प्रयत्न
- (no title)Share Total Views: 4 Share

