
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर : सामाईक भिंतीला रंग न दिल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांनी संगनमत करून २२ वर्षीय तरुणावर कटरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना बकवालनगर (वाळूज) परिसरात शुक्रवारी (दि. २८ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुणासह त्याची आई गंभीर जखमी झाली असून दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषीकेश भागवत तराळ (वय २२, रा. बकवाल नगर, वाळूज) हा आई-वडिलांसह राहत असून खासगी कंपनीत नोकरी करतो. त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे बाळू कडुबा करडेल हे दारूच्या नशेत वारंवार शिवीगाळ करत असतात. शुक्रवारी दुपारी घराच्या बाहेरील रंगकाम सुरू असताना सामाईक भिंतीला रंग न दिल्याच्या कारणावरून बाळू करडेल याने ऋषीकेशच्या आई रुक्मिणीबाई तराळ यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून वाद शांत केला होता.
मात्र सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ऋषीकेश घराबाहेर उभा असताना शुभम करडेल, तुषार करडेल, जयेश करडेल व बाळू करडेल यांनी पुन्हा वाद घालत त्याला बेदम मारहाण केली. तिघांनी त्याला पकडून ठेवले असता शुभम करडेल याने हातातील कटरने त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूस, डोक्यावर व उजव्या मनगटावर वार करून गंभीर जखमी केले.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी धावून आलेल्या आई रुक्मिणीबाई तराळ यांनाही आरोपींनी मारहाण केली. तसेच त्यांच्या उजव्या खांद्यावर कटरने वार करून जखमी केले. जखमी आई-मुलाला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी संबंधित चारही आरोपींविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सामाईक भिंतीच्या किरकोळ वादातून थेट प्राणघातक हल्ल्यापर्यंत गेलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
॰॰॰॰॰
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी - वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी - ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
