
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे) :
वाळूज महानगर : आज दि 24 फेब्रुवारी रोजी राजा शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बजाज नगर येथे बारावीच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर सुरळीतपणे पार पडत असताना भरारी पथकाने अचानक भेट देऊन परीक्षा केंद्राची पाहणी केली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा भरारी पथक प्रमुख अश्विनी लाटकर यांनी केंद्रावर भेट देत परीक्षा प्रक्रियेची सखोल तपासणी केली. त्यांच्या समवेत पथक सदस्य सुवर्णा देशमुख व सुनीता वाघ उपस्थित होत्या. परीक्षा केंद्रावरील व्यवस्था, शिस्त आणि पारदर्शकतेबाबत समाधान व्यक्त करत लाटकर यांनी विद्यार्थ्यांना निर्भयपणे व प्रामाणिकपणे परीक्षा देण्याचा सल्ला दिला. तसेच शिक्षकांनाही आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्याध्यापक डी. बी. साळुंखे, केंद्रप्रमुख श्रीमती जे. डी. शेजुळ, पी. यू. कदम, एन. बी. साळुंखे, विनोद शिंदे, डब्ल्यू. जे. गायकवाड, एन. डब्ल्यू. इंगळे, एस. टी. शिरसाट, पठाण ई. डी., जाधव एस. आर. आदी उपस्थित होते.
.. ..—————————————
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


