
वाळुजमहानगर – न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( गजानन राऊत ) –
वाळूज औद्योगिक नगरीतील ओऍसिस चौक ते रांजणगाव शेणपुंजी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर स्कुटीची धडक बसून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 22) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना पोलिसांनी तत्काळ मदत करत वाळूज येथील रुग्णालयात दाखल केले.
बीड बायपास, शिवाजीनगर येथील रहिवासी गणेश अशोक शिंदे (वय 32) हे मोहटा देवी येथे पूजेचे साहित्य आणण्यासाठी आले होते. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकला त्यांच्या स्कुटीची पाठीमागून जोरदार धडक बसली. संबंधित ट्रकचे रत्याच्या कडेला दुरुस्तीचे काम सुरू केले होते. मात्र, रस्त्यावर उभी असलेली गाडी लक्षात न आल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

अपघातात गणेश शिंदे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच डायल 112 पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सुहास मुंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल बनसोडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रिक्षा चालकाच्या मदतीने जखमींना तातडीने वाळूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, गाडीच्या क्रमांकावरून नातेवाईकांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांना अपघाताची माहिती देण्यात आली. नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली असून जखमींवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास सुरू आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

