Screenshot

वाळूज महानगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वाळूज महानगर परिसरातील तिसगाव येथील खवडा डोंगर भागात सात वर्षीय मुलीवर सावत्र वडिलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २० फेब्रुवारी) सायंकाळी उघडकीस आली. मुलीच्या प्रसंगावधानामुळे आणि शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठी अनर्थ टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब तिसगाव येथील खवडा डोंगर परिसरात वास्तव्यास आहे. पीडित मुलगी ही आईच्या पहिल्या विवाहातील असून आईने दुसरे लग्न केले आहे. आई व सावत्र वडील मजुरीचे काम करतात.
घटनेच्या दिवशी आई कामानिमित्त बाहेर गेली असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सावत्र वडिलाने मुलीला घरात एकटी पाहून तिचे कपडे काढून तिला मांडीवर बसवले आणि अयोग्य ठिकाणी स्पर्श करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे. मुलीने आरडाओरड केली; मात्र त्याने सोडले नाही. स्वतःचा बचाव करण्यासाठी मुलीने सावत्र वडिलाच्या हाताला चावा घेतला आणि संधी साधून तेथून पळ काढला.

मद्यधुंद अवस्थेमुळे आरोपीला तिचा पाठलाग करता आला नाही. मुलगी थेट शेजाऱ्यांच्या घरी धावत गेली. परिसरातील महिलांनी एकत्र येत आरोपीला पकडून चोप दिला व तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलीला ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. मुलीच्या अंगावर जखमा आढळून आल्या असून शरीरावर चाव्याचेही खुणा असल्याचे समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही संबंधित व्यक्तीकडून संशयास्पद प्रकार घडत असल्याची चर्चा होती.
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री पवार करीत आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मुलीला संरक्षणासाठी बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
…..
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

