
वाळूज : नुकत्याच संपन्न झालेल्या डॉ. होमी भाभा यंग सायंटिस्ट अवॉर्ड परीक्षा 2025-2026 मध्ये वाळूज येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स अंतर्गत ऑर्किड टेक्नो स्कूल व ऑर्किड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेची यशाची परंपरा कायम राखली आहे.
या स्पर्धात्मक परीक्षेच्या प्रॅक्टिकल (प्रत्याक्षिक) फेरीत इयत्ता ६ वी व ९ वी मधील एकूण पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ते पुढील मुंबई येथे होणाऱ्या तोंडी (Viva) परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
इयत्ता ६ वी मधून देवश्री कोतकर हिने यश संपादन केले आहे. तर इयत्ता ९ वी मधून सर्वेश कदम, सानिका सिंगम्पल्ली, सोहम थोरात आणि समर्थ मोगरे या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल फेरी यशस्वीरीत्या पार करत Viva राऊंडसाठी पात्रता मिळवली आहे.
विद्यार्थ्यांनी केलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक व्यक्त केले असून आगामी तोंडी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे वाळूज परिसरात आनंदाचे वातावरण असून ऑर्किड समूहाने पुन्हा एकदा गुणवत्तेची छाप उमटवली आहे.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
