
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर :
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापले आहे. आजच्या निवडणूक प्रक्रियेत पैसा हा मोठा घटक ठरत असल्याचे चित्र असले, तरी वडगाव कोल्हाटी–बजाजनगर परिसरात एक वेगळाच आदर्श नागरिकांसमोर उभा राहताना दिसत आहे.
वडगाव कोल्हाटी–बजाजनगर येथे दोन जिल्हा परिषद गट असून गट क्रमांक ५० व ५१ मधून एकूण ९ जिल्हा परिषद उमेदवार आणि १२ पंचायत समिती सदस्य निवडणूक रिंगणात आहेत. गट क्रमांक ५० मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेसाठी ललित सुरेश सोनवणे, तर पंचायत समितीसाठी दत्ता वर्पे व सतीश हिवाळे यांचे पॅनल निवडणूक लढवत आहे.

या पॅनलबाबत सध्या संपूर्ण वडगाव कोल्हाटी–बजाजनगर परिसरात एकच चर्चा आहे—या पॅनलमधील कोणत्याही उमेदवारावर कोणताही आरोप नाही. दुसरीकडे विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर विविध आरोप होत असून, बजाजनगरातील मोकळ्या भूखंडांचा विषय निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरत आहे.
पंचायत समितीचे उमेदवार दत्ता वर्पे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या अडीअडचणींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. सिडको परिसरातील बंद पडलेले आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न, कोविड काळात गरजू नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था, रस्त्यावरील कचरा व दुर्गंधीमुळे त्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सिडको कार्यालयासमोर आंदोलन, तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात केलेली आंदोलने—या सर्व कामांमुळे दत्ता वर्पे हे सामान्य नागरिकांचे विश्वासू नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत.

अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तत्काळ मदत करण्याची त्यांची भूमिका आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे “दत्ता वर्पे हे गरीब, प्रामाणिक आणि खरे समाजसेवक आहेत. ज्यांनी आतापर्यंत काम केले, तेच पुढेही काम करतील,” अशी ठाम भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
विरोधी उमेदवारांवर विविध आरोप असताना, दत्ता वर्पे यांच्यावर कोणताही डाग नसल्याने “त्यांच्या नावाने मत मागायला आम्हाला अजिबात लाज वाटत नाही,” असे मत नागरिक खुलेपणाने व्यक्त करत आहेत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हाची आणि या पॅनलची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
नागरिक स्वखुशीने प्रचारात सहभागी होत असून दत्ता वर्पे यांचा प्रचार जोमात करत आहेत. याच पार्श्वभूमीवर गट क्रमांक ५० मधील तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन दत्ता वर्पे यांनी नागरिकांना केले आहे.

॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

