
न्युज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर (अनिकेत घोडके)
वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पत्नी पीडित पुरुष आश्रमाच्या वतीने रविवारी (दि. 28 जून) एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पत्नी पीडित पुरुषांच्या न्याय व हक्कांसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने “पिंपळ पौर्णिमा” साजरी करून पिंपळ वृक्षाचे पूजन तसेच 108 प्रदक्षिणा घालत आपल्या व्यथा आणि मागण्या समाजासमोर मांडल्या.

संस्थेचे अध्यक्ष अॅड. भारत फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात अनेक पत्नी पीडित पुरुष सहभागी झाले. भारतीय संस्कृतीनुसार वटसावित्री पौर्णिमेला विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. मात्र, विवाहानंतर मानसिक छळ, खोटे गुन्हे, आर्थिक शोषण, सामाजिक बदनामी आणि कौटुंबिक वादांना सामोरे जावे लागणाऱ्या पुरुषांच्या वेदना व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या पुरुषांनी सांगितले की, अनेकांना वैवाहिक जीवनात गंभीर मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत आहे. काहींना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले गेले असून, काहींना कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पिंपळ वृक्षासमोर प्रतीकात्मक प्रार्थना करत आपल्या समस्या मांडल्या.
यावेळी पत्नी पीडित पुरुषांच्या वाढत्या मानसिक, सामाजिक आणि आर्थिक समस्या, खोट्या तक्रारींचे परिणाम, पुरुष आयोगाची स्थापना, प्रत्येक जिल्ह्यात पुरुष तक्रार निवारण केंद्र सुरू करणे, कौटुंबिक वादांची जलद सुनावणी आणि खोट्या तक्रारी सिद्ध झाल्यास जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.
अध्यक्ष अॅड. भारत फुलारे यांनी सांगितले की, “आमचा संघर्ष कोणत्याही स्त्रीविरोधात नाही. महिला आणि पुरुष दोघांनाही समान न्याय मिळावा, ही आमची भूमिका आहे. समाजात महिलांच्या प्रश्नांप्रमाणेच पत्नी पीडित पुरुषांच्या समस्यांकडेही संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे.”
कार्यक्रमास उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुरसिंग, तसेच संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक पत्नी पीडित पुरुष उपस्थित होते. संस्थेने शासन आणि समाजाने पुरुषांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी यावेळी पुन्हा एकदा केली.
-
वाळूज महानगरात अंकित वैद्य यांचा ‘गेम चेंजर’ सेमिनार; सराफ व्यावसायिकांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन

Share Total Views: 18 छत्रपती संभाजीनगर | वाळूज महानगर परिसरातील सराफ व्यावसायिकांसाठी आज, ९ ऑगस्ट
-
पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीला

Share Total Views: 1,080 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी
-
आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रती पंढरपूर येथे विठुरायाची महापूजा संपन्न

Share Total Views: 27 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :(अनिकेत घोडके) छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन
