
एमआयडीसी वाळूज पोलिसांची कारवाई
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अनिकेत घोडके)
वाळूज महानगर : काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येणारा गावठी कट्टा व 5 जिवंत काडतूसासह एका 24 वर्षीय आरोपीस वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पकडून जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी (दि. 27) रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वाळूज परिसरात करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी वाळूज ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर हे यांना सोमवारी (दि.27) रोजी गुप्तबातमीदार मार्फत माहीती मिळाली की, नायरा पेट्रोलपंप वडगाव (को.) येथे एक इसम देशी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) विक्री करण्यासाठी येणार आहे. या माहितीवरून पोउपनि. पाथरकर यांनी पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचुन आरोपी सुरज किसन पाईकराव (वय 24) रा.वडगाव धानोरा ता. पुसद जि.यवतमाळ (ह.मु. पाच एकर परिसर रांजनगाव शे.पु.) यास 7.30 वाजेच्या सुमारास ताब्यात घेवुन त्याच्या जवळील 30 हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा व लोखंडी धातुचा (मॅगझीन नसलेला त्यास लाकडी मुठ असलेला) गावठी कट्टा व 500 रुपये किमतीचे 5 जिवंत काडतुस तसेच 5 हजार रुपये किमतीचा काळया रंगाचा रिअलमी मोबाईल. असा एकुण 35 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस अंमलदार विशाल साहेबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि. रावसाहेब काकड करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त, प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी वाळूज ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोउपनि. प्रविण पाथरकर, पोउपनि दिनेश बन, बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, पोलीस हवालदार विनोद नितनवरे, जालींधर रंधे, पोलीस अंमलदार सुरेश कचे, मनमोहन कोलीमी, यशवंत गोबाडे, विशाल पाटील, मनोज बनसोडे, नितीन इनामे, गणेश सागरे, समाधान पाटील, हनुमान ठोके यांनी केली.
——-

-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 11 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न