
Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : एकीडके लग्नासाठी मुली मिळत नाही, दुसरीकडे त्याचाच फायदा घेऊन भावनेशी खेळून, खोटे आईवडील व मुलगी दखऊन, लग्नाचे खोटे नाटक करून पैसे लुबाडणाऱ्या टोळीला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी २१ ऑक्टबर रोजी गुन्हा दाखल होत, तपासात कुंडलिक शाहू चव्हाण वय ५४, रा. कमलापुर ता गंगापूर, कल्पना प्रकाश मुराळकर वय ४७ रा. कमलापूर ता गंगापूर, संगीता कुंडलिक चव्हाण वय ४२, लक्षी कॉलोनी छावणी, छ संभाजीनगर असे आरोपींचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २६ मार्च २०२४ रोजी फिर्यादी हरिश्चंद्र कुबेर वय ३३, यांची आरोपी कुंडलिक चव्हाण यांचासोबत लग्नाबद्दल बोलणे झाले, लग्न लाऊन देण्याच्या बदल्यात ३ लाख रुपये मोबदला आरोपी कुंडलिक चव्हाण याने मागितला, फिर्यादी कुबेर यांना विश्वास बसल्याने त्यांनी होकार दिला आणि २७ मार्च २०२४ रोजी नातेवाईकच्या समक्ष कुसुम अजय चव्हाण हिचे कुबेर याच्यासोबत गेवराई येथे लग्न लावण्यात आले. लग्नानंतर आरोपीने फिरीदाईकडून ठरलेले ३ लाख रुपये घेतले.

दि ३ मार्च २०२४ रोजी मुलगी किसुम हिने चुलत भाऊ मरण पावला असे सांगून निघून गेली, त्यानंतर वारंवार संपर्क करून सुद्धा मुलगी कुसुम येत नसल्याने फिर्यादीने लग्न जुळवून आणलेल्या आरोपी कुंडलिक चव्हाण याला संपर्क केला असता तोही उडवाउडवीचे उत्तर देत होता, फिर्यादी कुबेर यांना संशय आल्याने जोगेश्वरी येथे जाऊन चौकशी केली असता, ही एक टोळी असून या टोळीने अनेक मुलांना व कुटुंबांना गंडा घातलेला आहे, कुबेर यांनी तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून गुन्हा नोंद केला. गुन्ह्यातील तपासात एका आरोपींसह दोन महिलांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता कुबेर यांचासह नाना शंकर बदल, मोहोळकर, वाई जि सातारा, विनोद हनुमंत वाघ, जि सातारा, युवराज बदल जि सातारा, विपुल दिपक पाटील, सुरत ( गुजरात ) यांचीही फसवणूक केली, तसेच बोरगाव ता सिल्लोड, वैजापूर, नेवासा, मालेगाव, कापडणे, धुळे, अहमदनगर, नाशिक, या जिल्ह्यात खोटे लग्न लाऊन पैसे उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ह्या टोळीने फसवणूक केली असून गुन्हा उघड झाल्यानंतर अनेक तक्रारी नोंद होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ह्या टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांचे वरिष्ठाकडून पाठ थोपटण्यात आली आहे.
ही कामगिरी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोउपआ. नितीन बगाटे, सपोआ. महेंद्र देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनि. प्रवीण पाथरकर, दिनेश बन, यांचासह अंमलदार विनोद नितनवरे, जयश्री म्हस्के, जयश्री फूके, जालिंधर रंधे, सुरेश कचे, मनमोहनमुरली कोलिमी, यशवंत गोबाडे, विशाल पाटील, मनोज बनसोडे, नितीन इनामे, गणेश सागरे, समाधान पाटील, सीमा मुळे. यांनी केली.
——-

———-
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 10 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न