

वाळूज महानगर (प्रतिनिधी) – वाळूज महानगरातील नागरिकांमध्ये आपल्या समाजसेवेबद्दल विशेष ओळख निर्माण केलेले आणि अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सदैव पुढे असणारे समाजसेवक मनोज जैन यांनी पुन्हा एकदा जीव वाचविण्याचे उदाहरण घालून दिले आहे. यावेळी त्यांनी रस्त्याकडेला मरणयातना भोगत पडलेल्या ३५ वर्षीय तरुणाला वेळीच मदत करून त्याचे प्राण वाचवले.

घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की, वाळूज महानगरात अशोक साठे हे आपल्या कामानिमित्त फिरत असताना, रस्त्याकडेला एका कठड्यावर पोट धरून तीव्र वेदना सहन करत झोपलेला तरुण त्यांना दिसला. सुरुवातीला तो अपघातग्रस्त असल्याचा अंदाज त्यांनी बांधला, मात्र जवळ जाऊन पाहिले असता तो गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे स्पष्ट झाले.

अशोक साठे यांनी त्वरित समाजसेवक मनोज जैन यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच जैन यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना घटनेची कल्पना दिली आणि त्यांच्या सहकार्याने त्या तरुणाला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले असून, योग्य वेळी मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे त्याचा जीव वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अपघातग्रस्त आणि गरजू व्यक्तींसाठी नेहमी तत्पर असलेले मनोज जैन यांच्या या कार्याचे स्थानिक नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांच्या तात्परतेचे आणि मानवतेच्या भावनेने केलेल्या मदतीचे सोशल मीडियावरही गौरविले आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, “मनोज जैन हे फक्त अपघातात जखमींनाच नव्हे तर कोणत्याही संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देतात. त्यांच्या या कार्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत.”
या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की समाजातील संवेदनशील नागरिकांची उपस्थिती हीच खरी माणुसकीची ओळख आहे.
- अपघातग्रस्तांना अंबादास दानवे यांची मदतीचा हातShare Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – गंगापूर : छत्रपती
- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रसूती; आरोपीचा वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून शोध सुरूShare Total Views: 9 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – छत्रपती संभाजीनगर –
- केदारनाथ यात्रेत वडगावच्या भाविकाचा दुर्दैवी अंत : अंगावर दरड कोसळून मृत्यूShare Total Views: 21 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर : श्रद्धा
- समाजसेवक मनोज जैन यांच्या तत्परतेने गंभीर आजारी तरुणाचे प्राण वाचलेShare Total Views: 60,379 वाळूज महानगर (प्रतिनिधी) – वाळूज महानगरातील नागरिकांमध्ये आपल्या समाजसेवेबद्दल विशेष ओळख
- ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजराShare Total Views: 28 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –वाळूज महानगर : बजाज