
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : बजाज नगर, वाळूज एमआयडीसी येथील ऑर्किड टेक्नो स्कूल व ऑर्किड इंग्लिश स्कूलमध्ये आज (१५ ऑगस्ट) ७९ वा स्वातंत्र्यदिन पावसाळी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा क्षेत्रातील वरिष्ठ व गतिमान रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमोल उबाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाल व श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेचे अध्यक्ष, संचालक, मुख्याध्यापिका आणि इतर मान्यवरांचेही शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड आणि पाहलगाम येथे घडलेल्या घटनेवर आधारित मिशन सिंदूरचे प्रभावी सादरीकरण केले. लहानग्या विद्यार्थ्यांच्या दिमाखदार भाषणांनी उपस्थितांचे मन जिंकले.
प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापिकांच्या प्रेरणादायी भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. देशभक्तीच्या वातावरणात व उन्मुक्त आनंदात कार्यक्रम पार पडला.
- “चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
- शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
- खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
- मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू Share Total Views: 16 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
- बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपासShare Total Views: 25 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून





