August 19, 2025
5f4b771b-f304-4904-976a-f2439e1341d8

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

छत्रपती संभाजीनगर, दि.१४ तृतीयपंथी किंवा इतर गटांकडून लग्न, धार्मिक कार्यक्रम, जन्म-मृत्यू प्रसंग तसेच ट्रॅफिक सिग्नल व रस्त्यावर वाहनचालक व नागरिकांना पैशांची मागणी करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे.

पोलिस प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू राहणार आहेत.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, लग्न, धार्मिक वा कौटुंबिक कार्यक्रम, सण-उत्सव किंवा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास देऊन जबरदस्तीने पैसे मागण्यास बंदी राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत गुन्हा नोंदवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.


error: Content is protected !!