
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : ज्ञाननप्रबोधिनी इंग्लिश स्कूलमध्ये आज (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उद्योजक व सामाजिक चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व श्री निलेश कुंदे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे संचालक श्री उमेश दुधाट पाटील यांनी शाल व श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. याशिवाय श्री संजयजी महाजन, श्री उमेशजी थोरात, मुख्याध्यापिका सौ. स्मिता शरद शिवले यांच्यासह शिक्षकवृंद – सौ. गीतांजली कुचनकर, सौ. शीतल शेंडे, सौ. शीतल तुपे, सौ. सविता सूर्यवंशी, सौ. रेखा अंकमवार, सौ. दिपाली चौहान, सौ. मायुरी पवार व सौ. कविता उचाळ – यांनी मान्यवरांचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांचे मनोहारी प्रात्यक्षिक सादर केले. तसेच पाहलगाम येथे घडलेल्या घटनेचे **‘सिंदूर अॅक्ट’**च्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण केले. लहानग्या विद्यार्थ्यांनी दिलेली दिमाखदार भाषणेही उपस्थितांच्या मनात घर करून गेली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गीतांजली राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. शीतल शेंडे यांनी केले. देशभक्तीच्या वातावरणात व उन्मुक्त आनंदात स्वातंत्र्यदिन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 7 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 13 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 10 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 9 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


