August 19, 2025
dc7ff903-f803-4db9-a760-1c238cb0848d.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर

ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलमध्ये आज रक्षा बंधन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या मनगटावर राख्या बांधून औक्षण केले आणि परस्परांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षकांनी रक्षा बंधनाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर भाष्य केले. भावाबहिणींच्या पवित्र नात्याची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात दृढ व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. रक्षा बंधनाच्या निमित्ताने ‘परस्पर रक्षण आणि जबाबदारी’ हा संदेश सर्वत्र पोहोचविण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे संचालक श्री. उमेश दुधाट पाटील, मुख्याध्यापिका सौ. स्मिता शिवले, तसेच शिक्षकवृंद – गीतांजली कुचनकर, शीतल शेंडे, शीतल तुपे, सविता सूर्यवंशी, रेखा अंकमवार, दिपाली चौहान, मायुरी पवार, ताई-कविता उचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.


error: Content is protected !!