July 7, 2025
IMG_0771

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपल्या पाचव्या उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. यात फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब पाथ्रीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाथ्रीकर हे पक्षाच्या स्थापनेपासून मनसेसोबत काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची शक्यता पूर्वीपासूनच व्यक्त केली जात होती.

फुलंब्री मतदारसंघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आधीच उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मनसेच्या उमेदवारामुळे राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातील एकही जागा मनसे लढवणार नाही का, असा प्रश्न मनसैनिकांना पडला आहे. शहरातील राजकीय परिस्थिती पाहता, आगामी निवडणुकांमध्ये मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

—-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!