July 7, 2025
9729b64a-f6e4-4694-92d8-dbec3e9fb3e6

दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ मंगळवार रोजी जिम्नॅस्टिक प्रशिक्षणासाठी स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) येथे प्रशिक्षण घेणारी आणि छत्रपती संभाजीनगरची उदयोन्मुख खेळाडू कु. स्ट्राणी मुकेश मिठावाला आपल्या प्रशिक्षकासोबत १५ दिवसांच्या कॅम्पसाठी उज्बेकिस्तानला रवाना झाली.

साई (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया) केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील १४ वर्षाखालील सर्वात लहान व उदयोन्मुख खेळाडू कु. रुद्राणी मुकेश मिठावाला हिचा नुकत्याच ७ ऑक्टोबर २०२४ रोजी कोलकत्ता येथे झालेल्या फॉरेन एक्सपोझर साठीच्या निवड चाचणी स्पर्धेत भारतीय क्रीडा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या उज्बेकिस्तान येथील प्रशिक्षण कॅम्पसाठी निवड करण्यात आली. वयाच्या ५ वर्षापासून रुद्राणी हिने आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू मा. श्री. मकरंद जोशी यांच्याकडे आपल्या जिम्नॅस्टिक खेळाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर विभागीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रात श्रीमती. तनुजा गाढवे यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन वयाच्या १० व्या वर्षी तिची भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) तर्फे चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात उद्‌द्योन्मुख खेळाडू म्हणून तिची निवड झाली. साईचे प्रशिक्षक श्री. संजय मोरे आणि श्रीमती. पिंकी देव यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे तिने आपले कर्तुत्व सिद्ध केले. आतापर्यंत तिने अनेक अखिल भारतीय जिम्नॅस्टिक फेडरेशन, आंतरशालेय, विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मेडल प्राप्त केले. नुकत्याच शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय सीबीएसई शालेय स्पर्धेत तिची १४ वर्ष वयोगटातील राष्ट्रीय सीबीएसई टीममध्ये निवड झाली. याबद्दल साईच्या संचालिका डॉ. मोनिका घुगे, शहरातील आजी-माजी खेळाडू आणि समाजाच्या विविध घटकातून तिचे अभिनंदन केले जात आहे.

—-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!