August 2, 2025
img_1819.jpg

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी – न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साजापूर चौफुलीजवळ एक अशोक लेलँड कंपनीचा छोटा हत्ती वाहन (क्र. MH-20-EG-6265) मध्ये बेकायदेशीररित्या गोवंश वाहतूक करताना पकडण्यात आला. या प्रकरणी वाहन चालक आणि त्याच्या साथीदाराविरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नैना सुभाष राजपूत (वय 31), रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, बजाजनगर, या पॅकेजिंग उद्योग चालवतात आणि गोरक्षक म्हणूनही काम करतात. त्यांच्यासोबत नागेश बालाजी नरवडे आणि कमलेश्वर अरुण देशमाने हे देखील होते.दि 1 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास साजापूर चौफुलीजवळ RTO ऑफिस आणि MSEB कार्यालयाजवळ त्यांना एक संशयास्पद छोटा हत्ती वाहन दिसले. वाहन थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये गोवंश जातीची तीन गोहे (बैल) आणि एक वासरु अशा चार जनावरांना लहान दोऱ्यांनी गळ्याला बांधून अस्वच्छ अवस्थेत ठेवण्यात आले होते. वाहनातील जनावरांचे वर्णन आणि किंमत: तांबड्या रंगाचा गोन्हा – ₹15,000, चौकलेटी रंगाचा गोन्हा – ₹15,000, पांढऱ्या रंगाचा गोन्हा – ₹15,000, तांबड्या रंगाचे वासरु – ₹10,000, छोटा हत्ती वाहन – ₹2,00,000 एकूण किंमत – ₹2,55,000 यात आरोपी परमेश्वर भाऊसाहेब कान्हेरे (वय 27), रा. शरणापुर, छ. संभाजीनगर, रामेश्वर सुभाष सदावर्ते (वय 38), रा. महादेव मंदिराजवळ, शरणापुर गोवंश वाहतूक करण्याचा उद्देश स्पष्ट होताच फिर्यादी नैना राजपूत यांनी डायल 112 वर कॉल करून पोलीसांना माहिती दिली. पोलीस अंमलदार गजानन सोनुने, किशोर वाघे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि गाडीतील जनावरे व वाहनासह दोन्ही आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, जनावरांना अयोग्य पद्धतीने, वेदना देतील अशा प्रकारे वाहतूक करण्यात आल्याने संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.


error: Content is protected !!