
न्यूज मराठवाडा प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर
राजनगाव शेणपुणजी येथील साईनाथ साहेबराव अंभोरे (वय २५) या युवकाचा अपघात निष्काळजीपणामुळे झाल्याची घटना समोर आली आहे. सदर अपघात १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता घडला असून युवकावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
साईनाथ अंभोरे हे खाजगी नोकरी करत असून ते एकाखाजगी कंपनीत काम करता. काम संपल्यावर ते कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन घरी परतत असताना, S.N. हिट ट्रीटमेंट कंपनीजवळ भरधाव वेगाने असलेल्या सिटीबस (क्रमांक MH20EL1364) थेट गाडीला धडकली आणि गंभीर जखमी झाले.
अपघातात साईनाथ यांचे डोके व छातीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी साईनाथ अंभोर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांनी निष्काळजीपणाने सिटीबस चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 7 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 13 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 10 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 9 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


