

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे | छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीमधील साजापूर क्रांतीनगर भागात कार्यरत असलेला बनावट नोटा छापणारा छुपा छापखाना अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५९ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या बनावट ५०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या असून, सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण ८८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

आंबीलवाडीतील पानटपरीवरून उघडकीस
दि. २७ जुलै रोजी नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबीलवाडी भागात संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते ५०० रुपयांच्या बनावट नोटा वापरून सिगारेट खरेदी करत होते. त्यांच्याकडून ८०,००० रुपयांचा बनावट नोटा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात शिवाजी गंगर्डे (२७, कर्जत, अहिल्यानगर), सोमनाथ शिंदे (२५, अहिल्यानगर), प्रदीप कापरे (२८, बीड), मंगेश शिरसाठ (४०, शिवाजी नगर संभाजीनगर), विनोद अर्बट ५३) सातारा परिसरार, संभाजीनगर), आकाश बनसोडे (२७, पेठेनगर संभाजीनगर), अनिल पवार (मुकुंदनगर, संभाजीनगर), अंबादास ससाणे (अहिल्यानगर) हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
छापखान्यातून बनावट नोटा, शाई, कागद जप्त
पोलिस तपासात स्पष्ट झाले की, बनावट नोटांचे छपाई केंद्र वाळूज एमआयडीसीतील साजापूर क्रांतिनगर परिसरात कार्यरत होते. छापखान्यातून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कागद, शाई आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. याची एकूण किंमत सुमारे २ कोटी १६ लाख रुपये आहे.
संभाजीनगर आणि बीडमधून रॅकेटचे जाळे
अटक करण्यात आलेले तिघे आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून बनावट नोटा तयार करत होते. तर बीड जिल्ह्यातील आरोपी हा ग्राहकांना बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन जात असे. या टोळीने ५० हजार रुपये देऊन १ लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा वितरकांना पुरवल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांची सतर्क कारवाई
या कारवाईचे नेतृत्व अहिल्यानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा बाजारात आणण्याचा डाव आखत होती. पण पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करत हे रॅकेट उध्वस्त केले.
ही कामगिरी मा. श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली व मा. श्री. वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर तसेच श्री. अमोल भारती सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. नगर ग्रामीण विभाग यांचे सुचनानुसार श्री. प्रल्हाद गिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ तसेच पोहेकॉ सुभाष थोरात, पोहेकॉ रविकिरण सोनटक्के, पोहेकॉ बाबासाहेब खेडकर, पोहेकॉ/मंगेश खरमाळे, पोहेकॉ शरद वांढेकर, पोहेकॉ खंडु शिंदे, पोकॉ/सागर मिसाळ, पोकॉ/राजु खेडकर, पोकॉ/विक्रांत भालसिंग, पोकॉ/अदिनाथ शिरसाठ, पोकॉ/अन्सार शेख तसेच मपोहेकॉ/मोहिनी कर्डक, दक्षिण विभाग मोबईल सेलचे पोकॉ/ नितीन शिंदे यांचे पथकाने केली आहे.
॰॰॰॰
- गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाचा गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश; दोन आरोपी ताब्यातShare Total Views: 3 छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी – न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे
- वाळूज एमआयडीसी अतिक्रमणाला दोन दिवसाचा अल्टिमेटम; ‘या’ नागरिकांना तूर्तास दिलासा…Share Total Views: 9 📰 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे | वाळूज महानगर वाळूज
- वाळूज एमआयडीसीमधून बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त, अहिल्यानगर पोलिसांची कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल, ७ आरोपी जेरबंदShare Total Views: 20 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे | छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर
- मशीनचे ज्ञान नसताना काम लावले; महिलेचा हात गमावला – कंपनी मालकाविरुद्ध गुन्हाShare Total Views: 13 📰 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे | वाळूज महानगर वाळूज
- दोन दिवसानंतर वाळूज एमआयडीसीमध्ये अतिक्रमण मोहिमेला सुरुवातShare Total Views: 20 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – छत्रपती संभाजीनगर :