August 2, 2025
30cf86f7-70d3-4d55-b1d2-befe39451151.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) 

छत्रपती संभाजीनगर : गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातमधून अपहरण झालेल्या सहा महिन्यांच्या बालिकेची सुखरूप सुटका करत चार आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

दिनांक ३० जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद (गुजरात) येथून एका महिलेने आपल्या पतीसह, ६ महिन्यांच्या बालिकेसह रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण केल्याची माहिती मिळाली होती. गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार अहमदाबाद ग्रामीण येथील झाला होता. आरोपींनी अपहरण करून छत्रपती संभाजीनगर शहरात बालिका व आरोपी आणले असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.

त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने तत्काळ तपास सुरू करत रेल्वे स्थानक परिसरातून संशयित महिला, पुरुष व ६ महिन्यांच्या बालिकेस ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अपहरणाची कबुली दिली असून, इतर तीन आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत यशेश त्रिकमभाई राठोड (वय २६),विमल प्रभुलाल सोलंकी (वय ३०), मीनाक्षी महेश सोलंकी (वय २९),ताजीम बानो विश्वास खान (वय ३२) या प्रकरणात सर्व आरोपींना गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बालिका सुखरूप असून, तिच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे. 

अपहरणातील बालकांची हैदराबाद येथे विक्री –

पोलिसांच्या चौकशीमध्ये विविध जिल्यातून बालकांना अपहरण करून त्यांना हैद्राबाद येथे विक्री करत असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. यात नाशिक येथील एक एजेंट असून पुढील तपास पोलीस करत आहे. 

ही कारवाई सदरची कामगिरी ही मा.श्री. प्रविण पवार, पोलीस आयुक्त, मा.श्री. रत्नाकर नवले, पोलीस उपायुक्त (गुन्हे), मा.श्री. सुभाष भुजंग, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), मा.श्री. संभाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोउपनि संदीप शिंदे, पोह/योगेश नवसारे, पोअं/मनोज विखनकर, पोअं/राहुल बंगाळे, पोअं/विजय घुगे, मपोअं/प्रिती इलग, चापोअं/सोमनाथ दुकळे सर्व नेमणूक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर शहर यांनी केली आहे.


error: Content is protected !!