
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे | वाळूज महानगर
वाळूज औद्योगिक परिसरातील प्लॉट क्रमांक M-101 समोरील रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी क्रूझर क्र एम एच १३ ए सी ९५८९ वाहनाने अंधाधुंद धडक दिल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले असून पाच वाहने नुकसानग्रस्त झाली आहेत. ही संपूर्ण घटना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहनचालकामुळे घडल्याचे उघड झाले आहे.


संजय बाबुराव कदम (वय ४०, रा. जोगेश्वरी) असे आरोपी चालकाचे नाव असून, त्याला पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालक औद्योगिक क्षेत्रातून जोगेश्वरीकडे जात असताना टायको कंपनीसमोरील रस्त्यावर त्याचे वाहन अचानक बेजबाबदारपणे धावू लागले.

या अपघातात एका कार, रिक्षा, दुचाकीसह अन्य काही वाहनांचे नुकसान झाले, तर सुमारे ५ ते १० कामगारांना धडक बसली. यातील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना माहिती दिली आणि काही संतप्त नागरिकांनी चालकाला चोप दिला.

चालक इतका मद्यधुंद होता की त्याला चालणेही शक्य होत नव्हते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, आरोपीच्या कुटुंबीयांनीही त्याच्याशी असलेल्या संतापाचे चित्र स्पष्ट केले आहे. “तो नेहमीच दारू पिऊन घरात भांडण करतो. कालच त्याने घरच्यांना मारहाण केली होती,” अशी माहिती कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना दिली.
या घटनेमुळे वाळूज औद्योगिक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. गंभीर जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


