August 2, 2025
85df6ef5-51ba-4005-8515-011c95c671a2.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तदेव ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील पत्रकारांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पत्रकार संघटनेने आज वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याला निवेदन दिले. पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांची गंभीर दखल घेऊन दोषींवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पत्रकारांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, लोकशाही चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होणे हे अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक आहे. अशा घटनांमुळे गुन्हेगारांचा वावर बिनधास्त होत असून पोलिस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

छत्रपती संभाजीनगर मधील एका नामांकित दैनिकाचे पत्रकार मच्छिंद्र नगरे यांच्यावर मोबाईल हिसकावून घेत शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, पत्रकार संघाने या घटनेचा निषेध करत दोषींवर विविध कलमानंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. तसेच वाळूज एमआयडीसी मधील प्रताप चौक येथे पत्रकार संजय निकम यांच्या अंगावर दुचाकी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती या दोन्ही घटना एका आठवड्यात घडण्याने पोलिसांनी असल्या घटना रोखण्यासाठी दोषींवर तातडीने कारवाई करावी, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करावा, पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांना पायबंद घालण्यासाठी विशेष पथक नेमावे, संबंधित घटनेतील पोलिसांची भूमिका चौकशीस घेत कारवाई करावी, राज्यस्तरीय पत्रकार सुरक्षा कायदा लागू करावा, जिल्हास्तरावर पत्रकार सुरक्षा समिती स्थापन करावी अशा विविध मागण्याचे पत्र वाळूज एनआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. यावेळी पत्रकर
संतोष बारगळ, अशोक कांबळे, शिवाजी बोडखे, संदीप लोखंडे, संजय निकम, संजय काळे, निलेश भारती, राजू जंगले, डि.पी.वाघ, पायल बुलबुले, अशोक साठे, कविराज साळे, अनिकेत घोडके, जगदीश बुलबुले यांची उपस्थिती होती


error: Content is protected !!