

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | छत्रपती संभाजीनगर | दि. 25 जुलै 2025
छत्रपती संभाजीनगरमधील मिल कॉर्नर परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकारात एका मोठ्या दैनिकाच्या पत्रकार आणि छायाचित्रकार मच्छिंद्र आनंदराव नागरे (वय 47) यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा प्रकार लकी स्टार हॉटेल येथे घडला, जेव्हा सिटीचौक पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता.
पत्रकार नागरे हे सदर घटनेचे वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी हजर होते. त्यांनी आपल्या मोबाईल फोनद्वारे व्हिडिओ आणि छायाचित्रे टिपण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी हॉटेलचे मालक अफसर खान, त्यांचे दोन मुले आणि त्यांच्यासोबत ४-५ अनोळखी व्यक्तींनी मिळून नागरे यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
पत्रकार असल्याचे ओळखपत्र दाखवून सांगूनही अफसर खान याच्या मुलाने त्यांच्याकडील मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि त्यामधील चित्रीकरण डिलीट करून महत्त्वाचे पुरावे नष्ट केले. त्यानंतर त्यांनी धमकी देत म्हटले, “तु आम्हाला ओळखत नाहीस का? आम्ही तुझे हातपाय तोडून टाकू, तुला गायब करून टाकू!” अशा धमक्या देत त्यांना मानसिक त्रास दिला.
इतक्यावरच न थांबता, आरोपींनी पत्रकाराच्या शर्टची कॉलर पकडून चापट मारहाण केली. अफसर खान याच्या दुसऱ्या मुलाने पॅन्टची चेन उघडून अश्लील कृत्य करत नागरे यांचा अपमान केला. आरोपींनी पत्रकाराला जबरदस्तीने हॉटेलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रकाराने प्रसंगावधान राखून स्वतःची सुटका करून घेतली.
या घटनेनंतर पत्रकार नागरे यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, खालील कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे: भारतीय न्याय संहिता, 2023 कलम 189(2): शासकीय कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणे, कलम 191(2): खोटे आरोप / खोटी माहिती देणे, कलम 115(2): गुन्ह्यास प्रवृत्त करणे, कलम 352: मारहाण / हातघाई, कलम 351(2): धमकी व मानसिक त्रास, महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम, २०१७ कलम 4: पत्रकारांवरील हल्ला आणि त्यांची मालमत्ता नष्ट केल्याबद्दल विशेष तरतूद हा विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारीत पत्रकाराने स्पष्ट नमूद केले की, चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांच्यावर तिघांनी मिळून हल्ला केला आणि जबरदस्तीने अपहरणाचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
६ दिवसापूर्वी झाला होता अजून एका पत्रकारावर हल्ला –
वाळूज एमआयडीसीमध्ये दि २० जुलै रोजी एका मोठ्या दैनिकाच्या पत्रकारावर प्रताप चौकात दुचाकीची धडक देऊन जीवे मारण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ करण्यात अली होती याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर आठवड्यात हा दुसरा हल्ला असल्याने पत्रकार क्षेत्रात काम करण्याऱ्या पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला असल्या होणाऱ्या हल्याला आळा बसावा अशी मागणी विविध संघटनेकडून केली जात आहे.
- गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाचा गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश; दोन आरोपी ताब्यातShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी – न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे
- वाळूज एमआयडीसी अतिक्रमणाला दोन दिवसाचा अल्टिमेटम; ‘या’ नागरिकांना तूर्तास दिलासा…Share Total Views: 10 📰 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे | वाळूज महानगर वाळूज
- वाळूज एमआयडीसीमधून बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त, अहिल्यानगर पोलिसांची कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल, ७ आरोपी जेरबंदShare Total Views: 20 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे | छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर
- मशीनचे ज्ञान नसताना काम लावले; महिलेचा हात गमावला – कंपनी मालकाविरुद्ध गुन्हाShare Total Views: 16 📰 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे | वाळूज महानगर वाळूज
- दोन दिवसानंतर वाळूज एमआयडीसीमध्ये अतिक्रमण मोहिमेला सुरुवातShare Total Views: 22 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – छत्रपती संभाजीनगर :