July 21, 2025
2b37dd4e-abe0-485b-869f-1b07514f3538-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) –

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून गंगाई पार्क, योगेश हजबे यांच्या पत्राच्या शेडमध्ये, वडगाव कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर येथे दि. १५ जुलै  रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास देशी दारू विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ट पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार राहुल भंगाळे, योगेश नवसारे, मनोज विखणकर,मंगेश शिंदे यांनी केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेजण देशी दारूच्या बाटल्या विक्रीसाठी बॉक्समध्ये घेऊन आले होते. पोलिसांनी सापळा रचून राजीव लक्ष्मण ठाकूर (वय 28 वर्षे, रा. गंगाई पार्क, वडगाव कोल्हाटी व लक्ष्मण रघुनाथ ठाकूर (वय 30 वर्षे, रा. वडगाव कोल्हाटी यांना ताब्यात घेऊनत्यांच्याकडून 34,560/- किमतीचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. त्यात एकूण 9 बॉक्समध्ये देशी दारू प्रत्येक बॉक्समध्ये 48 बाटल्या (180ml) दर बाटलीची किंमत ₹80/- त्यांनी ही दारू एका टोळीच्या माध्यमातून विक्रीसाठी आणल्याचे मान्य केले असून, संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या कारवाईमुळे बेकायदेशीर दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


error: Content is protected !!