न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) –
छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव येथे दि. १५ जुलै रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास ९ दरोडेखोरांनी मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला आणि चोरटे पळ काढण्यास भाग पाडले गेले.
ही घटना संदीप चाबुकस्वार यांच्या घरी घडली. चोरट्यांनी घरातील एका खोलीची बाहेरून कडी लावून दुसऱ्या खोलीतील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील सदस्यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड सुरु केली. आवाज ऐकून शेजारी आणि गावकरी देखील जागे झाले.

गावकऱ्यांनी जागरूकता दाखवत चोरट्यांचा पाठलाग केला. त्यामध्ये ९ दरोडेखोर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. चोरटे पळताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून यामुळे पोलीस तपासाला मदत होणार आहे.
ही घटना घडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीच्या वेळेस पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून, चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत
तिसगाव ग्रामपंचायत कडून पोलिसांना पत्रद्वारे विनंती –
तिसगाव येथील दरोड्याच्या प्रयत्नानंतर ग्रामपंचायतीने घटनेची गंभीर दखल घेतली असून, गावात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसी पोलिसांना गस्त वाढवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी गावात पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी स्पष्ट मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. यावेळी सरपंच सौ.शकुंतला कसुरे, उपसरपंच गणेश बिरंगळ ग्रामपंचायत अधिकारी सौ.शितल उमाप ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव,राजेश कसुरे, नागेश कुठारे,नितिन जाधव,विष्णु जाधव,अरूणा जाधव,प्रविण हांडे,संगीता अंभोरे, गोदावरी कोल्हे,रेणुका सलामपुरे, पुजा तरैय्यावाले उपस्थित होत तसेच निवेदन देताना उपसरपंच गणेश बिरंगळ, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव तसेच लालचंद कसुरे यांचासह आदींची उपस्थिती होती.
॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


