December 1, 2025
img_1010-1.jpg

वाळूज (न्युज मराठवाडा वृत्तसेवा – संदीप लोखंडे)

वाळूज महानगरातील गाडेकर फुलरा येथे राहणाऱ्या एका शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ५८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १३ जुलै रोजी पहाटे १.३० ते ३.०० वाजेच्या दरम्यान घडली.

अविनाश मुरलीधर बंदरकर (वय ४१) असे घरफोडी झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. बंदरकर हे सध्या प्राथमिक शाळा गुरुधानोरा, ता. गंगापूर येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी ते आपल्या पत्नी व दोन मुलांसह १२ जुलै रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे गेले होते.

या दरम्यान रात्री ३.३० वाजता त्यांना शेजारील रहिवासी बापूसाहेब रोहकले यांनी फोन करून चोरी झाल्याची माहिती दिली. तसेच सीसीटीव्ही फुटेजही पाठवले. फुटेज पाहून बंदरकर यांना चोरीची खात्री पटली. त्यांनी तात्काळ वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली.

*ad.

१३ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता घरी परतल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता, मुख्य दरवाजाचे सेफ्टी लॉक तोडून चोरट्याने घरात प्रवेश केल्याचे लक्षात आले. घरातील एका कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे समोर यामध्ये सोन्याचे वेल (४ ग्रॅम) – ₹६,०००, सोन्याचे गंठन (९ ग्रॅम) – ₹१५,०००, सोन्याचे लॉकेट (१५ ग्रॅम) – ₹२१,०००, सोन्याची अंगठी (७ ग्रॅम) – ₹११,०००, मंगळसूत्राची वाटी (दीड ग्रॅम) – ₹५,००० असा ३.५ तोळ्याचे सोन्याचे दागिने एकूण ₹५८,०००, मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरटे चोरी करतेवेळी कॅमेरात कैद झाले असून या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.


error: Content is protected !!