July 21, 2025
1dbbadff-0631-4fb5-b4b7-4be727c82fd4

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) |

वाळूज महानगर । छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या १७ वर्षीय मुलीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांविरोधात छळाच्या आरोपाखाली वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनुसार, मुलीला स्वयंपाक — विशेषतः चपात्या बनवता येत नसल्याने तिच्या आई-वडिलांकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. केवळ चपात्या नीट करता येत नाहीत या कारणावरून तिच्या हाताला चटके देणे, मारहाण करणे, तसेच घराच्या गच्चीवर आणि बाथरूममध्ये बंद करून ठेवणे असे गंभीर आरोप तिने आपल्या तक्रारीत केले आहेत.

ही घटना दिनांक १३ जुलै रोजी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलीने स्वतःहून पोलिसांकडे तक्रार देणे ही बाब गांभीर्याने घेतली जात असून, कुटुंबातील अंतर्गत वागणुकीचा हा प्रकार समाजात मोठी खळबळ निर्माण करणारा आहे.

पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत असून संबंधित आई-वडिलांची चौकशी सुरू आहे.

॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!