
न्यूज मराठवाडा ( वाळुज महानगर )
महाराष्ट्र युनायटेड होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना व वाळूज महानगर वैद्यकीय मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 जुलै रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक बजाजनगर येथे पार पडली. राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या हक्क व सन्मानाच्या लढ्यासाठी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरली.
जून 2016 मध्ये महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आणि एम.बी.बी.एस. डॉक्टरांची ग्रामीण भागातील अनास्था लक्षात घेऊन होमिओपॅथिक डॉक्टरांना “सी.सी.एम.पी.”
हा एक वर्षाचा कोर्स सुरू केला होता. हा कोर्स महाराष्ट्र होमिओपॅथिक ऍक्ट 1960 व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऍक्ट 1965 अंतर्गत कायदेशीररीत्या समाविष्ट करून विधिमंडळात मंजूर केला गेला होता.
जुलै 2016 पासून हा कोर्स महाराष्ट्रात लागू करण्यात आला. या अंतर्गत बी.एच.एम.एस. डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र वैद्यक परिषद ( एम एम सी ) च्या शेड्युल 28 मध्ये 15 जुलै 2025 पासून होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, तसेच याचे अधिकृत नोटिफिकेशनही प्रसिद्ध झाले होते.
मात्र इंडियन मेडिकल असोसिएशन ने सरकारवर दबाव टाकून ही पूर्णतः कायदेशीर प्रक्रिया केवळ 24 तासांत स्थगित केली. हा निर्णय वैद्यकीय क्षेत्रात खळबळजनक मानला जात असून, तो होमिओपॅथिक डॉक्टरांवर अन्याय करणारा आहे.
त्याचबरोबर आय.एम.ए. व काही माध्यमांतून सी.सी.एम.पी. कोर्स फक्त 6 महिन्यांचा असल्याचा अपप्रचार सुरू करण्यात आला. प्रत्यक्षात हा कोर्स 6 वर्ष 6 महिन्यांचा आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये होमिओपॅथिक डॉक्टर व सी.सी.एम.पी. कोर्स बाबत चुकीची माहिती सादर करून सरकार व जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप डॉक्टरांकडून करण्यात आला.
या अन्यायाच्या व दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्रातील लाखो होमिओपॅथिक डॉक्टर 16 जुलैपासून आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आज झालेल्या वाळूज महानगर होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्या तातडीच्या बैठकीला खालील मान्यवर डॉक्टर उपस्थित होते –
डॉ. अनिल अंभोरे, डॉ. विलास भाकरे, डॉ. विश्वासराव साळुंखे, डॉ. सुनील लघाने, डॉ. साहेब वाकळे, डॉ. दिगंबर माके, डॉ. गजानन काळे, डॉ. विलास कोटकर, डॉ. अक्षय लघाने, डॉ. भास्कर जायभाये, डॉ. किशोर बोराडे, डॉ. मुकेश क्षीरसागर, डॉ. गोविंद सारडा, डॉ. प्रदीप चव्हाण, डॉ. विनोद राऊत, डॉ. गोरख शेळके, डॉ. दत्ता मगर, डॉ. कृष्णा पालकर, डॉ. अशोक बोलकर, डॉ. यशवंत तुळसे, डॉ. संतोष कोरे, डॉ. कैलास खोबरे, डॉ. गणेश तनपुरे आदी डॉक्टरांची उपस्थिती लाभली.
ही बैठक डॉक्टरांच्या एकजुटीचे प्रतीक ठरली असून, शासनाने जर लवकरच न्याय दिला नाही, तर राज्यभर आंदोलनाची तीव्र लाट निर्माण होईल, असा ठाम इशारा बैठकीतून देण्यात आला.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


