July 20, 2025
IMG_0927

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर | १२ जुलै :

बजाजनगरमधील जय भवानी चौकात आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. घरासमोर अंगणात खेळत असलेल्या १० वर्षीय चिमुकलीला दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवर जबरदस्तीने बसवून प्रताप चौकाजवळील झुडपांकडे नेत अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चिमुकलीने प्रसंगावधान राखत मागे बसलेल्या तरुणाच्या हाताला चावा घेतला नेत असताना चिमुकलीने मागे बसलेल्या तरुणाच्या हाताला चावा घेतला, झटापटीत दुचाकीचा वेग कमी झाला, हीच संधी साधून मुलीला खाली  उतरता आले, हातातून निसटताच रत्याने पळाली, दुचाकी स्वारांनी तिला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला परंतु नागरिकांच्या भीतीने त्यांना ते जमलं नाही, तिने   थेट घर गाठून आजोबाला थरथरत सविस्तर माहिती दिली.  दुचाकीवरून उडी मारून पळ काढला. घरी पोहोचताच तिने थरथरत आजोबांना सर्व प्रकार सांगितला. आजोबांनी तात्काळ आई-वडिलांना माहिती दिली आणि सर्वांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पावले उचलली. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. सध्या दोन्ही संशयित तरुणांचा शोध सुरू असून त्यांचा लवकरच छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घाबरलेली चिमुकली रडत सांगत होती घटना

घटनेनंतर चिमुकली अत्यंत घाबरलेली व भावनिक अवस्थेत होती. पोलीस ठाण्यात सविस्तर माहिती सांगताना ती रडत होती. तिच्या आई-वडिलांनी व आजोबांनीही या प्रसंगामुळे अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.

या धाडसी चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून तिच्या धैर्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!