
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
गंगापूर – अंबेलोहळ गावात अमानुष मारहाण करून झालेल्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना आज (13 जुलै) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील उर्वरित दोन फरार आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे.
अर्जुन रतन प्रधान या २५ वर्षीय तरुणाला वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबेलोहळ येथे अमानुष मारहाण करून निर्घृणपणे ठार मारण्यात आले होते. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पांडुरंग वामन प्रधान, अंकुश दिलीप प्रधान, नंदकुमार दादासाहेब बोराडे, विठ्ठल नामदेव प्रधान, निलेश मच्छिंद्र प्रधान या पाच आरोपींना अटक केली होती.
आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने सर्व पाच आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच अद्याप फरार असलेले अजय अशोक प्रधान व अनिकेत संजय काकडे या दोघांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
या खून प्रकरणाचा पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
॰॰॰
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 367 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



