November 21, 2024
IMG_0639

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी महायुतीला दणका दिला होता. पाडायचे आदेश त्यांनी दिले होते. त्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला त्याचा फटका बसला होता.

जालना:
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मराठा समाजाची एक महत्वाची बैठक आज अंतरवाली सराटीत होत आहे. मनोज जरांगे पाटील या बैठकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत समाजाची काय भूमीका असेल ते जाहीर करणार आहेत. लढणार की पाडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे जरांगे काय निर्णय घेतात यावर विधानसभेची गणितं ही ठरणार आहेत. अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळावी यासाठी जरांगे पाटील यांच्याकडे मुलाखत दिल्या आहेत. जर निवडणुका लढल्या तर मराठा समजाला फायदा होईल असे मानणारा मोठा वर्ग आहे. तर दुसरीकडे राजकारणात न जाता लोकसभे प्रमाणे धोरण स्विकारावे असे सांगणाराही मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यातून कोणता मार्ग जरांगे स्विकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीबाबत आपली भूमीका गुलदस्त्यात ठेवली आहे. शिवाय जवळपास 800 जणांनी जरांगे यांच्याकडे उमेदवारीही मागितली आहे. त्यांच्या मुलाखती ही घेण्यात आल्यात. जवळपास 120 मतदार संघाचा आढावाही घेण्यात आला. त्यात पोषक वातावरण असल्याचेही सांगितले गेले. या सर्व पार्श्वभूमीवर आता जरांगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारमध्ये जावून स्वत: निर्णय घ्यायचा की सरकार बदलून दुसऱ्या सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडायचे याचा विचार जरांगे करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर विधानसभेची सर्व गणितं ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!