November 21, 2024
1000346941

न्यूज मराठवाडा नेटवर्क

मुबंई

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नेत्यांची इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे. शिवसंग्रामच्या नेत्या तथा दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

सुप्रिया सुळे आणि शरद यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांना पक्षाकडून बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

मराठा आरक्षणाबाबत नेहमी आग्रही राहिलेले शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलने झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सांगड घालण्यात येते असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, ज्योती मेटे यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणूक देखील लढण्याची इच्छा होती. त्यासंदर्भात त्यांनी शरद पवार गटासोबत चर्चाही केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी बीड लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. व्यापक समाजहित लक्षात घेऊन बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत आहोत, असे ज्योती मेटे यांनी त्यावेळी सांगितले होते.
…………………………………………………………


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!