November 21, 2024
1000317139

एमआयडीसी वाळूज पोलिसांची कारवाई

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर

    मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 17 रोजी मनोज शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदार यांनी माहिती दिली की, दत्तनगर राममंदीच्या पाठीमागे रांजनगांव शे.पु. येथे एक इसम त्याच्या राहते घरी अवैध रित्या गांजा कनबिन वनस्पतीची चोरटी विक्री करत आहे. 

   मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला असता राममंदीराच्या पाठीमागे कडूबा शेखूजी नवगिरे रा.घर नं. 5170 दत्तनगर रांजनगांव शे.पु. यांच्या भाड्याच्या रूम मध्ये इसम नामे 1) करण राजू धोत्रे वय 23 वर्ष, हरिओमनगर (दत्तनगर) राममंदीराच्या पाठीमागे रांजनगांव शे पु ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर व 2) विधीसंघर्ष ग्रस्त बालक वय 16 वर्ष हे मिळून आलेल्या 10X10 च्या रूमची झडती घेतली असता रुम मध्ये 1) 37,890 /- रुकिंचा 02 किलो 105 ग्रॅम वजनाचा उग्रट वासाचा हिरव्या रंगाचे ओलसर झाडपत्ता, फुले, शेंडे, (गांजा) कैनबिन वनस्पती प्लास्टीक पिशवनी मध्ये किलो 18000/- रु.किं, अं. 2000.00 रु कि.चे गांजा भरण्याकरीता वापरण्यात येणारे 63 नग प्लास्टिकचे छोटे पाउच, 3) 50.00 रु.किं.चे स्टपलर असा एकुण 37,940 /- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचा गांजा हा आरोपी ने चोरटो विक्री करण्यासाठी स्वतः ताब्यात बाळगला असल्याचे सांगीतले.

    सपोनि मनोज शिंदे यांनी आरोपी यास विचारणा केली असता करण राजू धोजे याच्यासाठी काम करत असून त्याच्या सांगण्यावरून त्याच्या सोबत गांजा पुडयामध्ये भरून विक्री करत असल्याचे सांगीतले. त्यानंतर करण राजू धोजे यास विचारणा केली असता तो वि.सं.बा.हा त्याच्याकडे कामाला असून तो करण धोजे सोबत गांजा विक्री करण्याचे काम करतो. सदरचा गांजा कोठून आनला याबाबत विचारणा केली असता सदरचा गांजा करण राजू धोत्रे याने व त्याचा ओळखची विक्रम रामदास गायकवाड वय 34 वर्ष, रा. दत्तनगर गल्ली नं. 9, रांजनगांव शे.पु. यांनी मिळून विक्की साळवे रा वडार गल्ली दत्तनगर रांजनगांव शे.पु. मुळ पत्ता संजयनगर मुकुंदवाडी याच्याकडून खरेदी केला असल्याचे सांगीतले. त्यावरून दि 18 रोजी पो.स्टे.एम. वाळूज येथे फिर्यादी यांचे तक्रारी वरून आरोपी करण राजू थोजे वय 23 वर्ष, हरिओमनगर (दत्तनगर) राममंदीराच्या पाठीमागे रांजनगांव शे.पु  व विधीसंघर्ष ग्रस्त बालक वय 16 वर्ष, विक्रम रामदास गायकवाड वय 34 वर्ष, रा दत्तनगर गल्ली नं. 9, रांजनगांव शे. पु., विक्की साळवे रा वडार गल्ली दत्तनगर रांजनगांव शे.पु. यांचे विरुध्द गुन्हा दखाल झालेला आहे. या वरून दोन आरोपींना दिनांक 18  रोजी अटक केली. तर वि.सं.बा.याचे वावत योग्यती कायदेशीर पुर्तता तपास अधिकारी करत आहेत. सदर गुन्हयाचा तपास सपोनि संजय गित्ते हे करत आहेत.

    सदरची कामगिरी ही कृष्णा शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शना खाली सपोनि मनोज शिंदे, सपोनि संजय गित्ते, पोउपनि  प्रविण पाचरकर, दिनेश वन, पोह बाळासाहेब आंधळे, जालिंदर रंधे, पोअं राजाभाऊ कोल्हे, हनुमान ठोके, पोअं. गणेश सागरे, यशवंत गोवाडे, विशाल पाटील, समाधान पाटील, नितीन इनामे, विनोद नितनवरे, सुरेश कचे, चालक बबलू थोरात यांनी केलेली आहे.

——————-



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!