July 21, 2025
img_0876-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)

गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५ –

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंबेलोहळ येथे गट नंबर ३७ आज सकाळी एक थरकाप उडवणारी घटना समोर आली. २३ वर्षीय कामगार अर्जुन रतन प्रधान याचा अमानुष मारहाण करून खून करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.

अर्जुन रतन प्रधान (रा. कमलापूर रोड, वाळूज) हा वाळूज एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. कालच त्याचा पगार झाला होता. आज सकाळी त्याचा सावत्र भाऊ रामकृष्ण याला अर्जुन रस्त्याच्या कडेला अर्धनग्न अवस्थेत गंभीर जखमी स्थितीत आढळून आला. ही बाब पोलिसांना कळवण्यात आली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अर्जुनच्या आईने मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. प्राथमिक तपासात अर्जुनला कपडे काढून अमानुषपणे मारहाण केल्याचे समोर आले असून त्यातूनच त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी डॉग पथक, ठसे तज्ञ, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक नरेश ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक आत्माराम बोराडे, अंमलदार राजाभाऊ कोल्हे, बाबासाहेब काकडे, किशोर साबळे तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

या क्रूर हत्येमुळे अंबेलोहळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत.


error: Content is protected !!